What's New

Department and Planning

श्रीम. कल्पना वसंत खोंडे अंगणवाडी कार्यकर्ती भेंडीचापाडा हया दररोज सकाळी 9.00 वाजता अंगणवाडी केंद्रात वेळेवर हजर असतात अंगणवाडी केंद्रात आलेली बालके यांनी स्वत:ची स्वच्छत: केलेली आहे काय याची खात्री करते. स्वच्छता नसेल तर त्या स्वत: बालकाची स्वच्छता करुन घेतात व सर्व बालकांना प्रार्थनेसाठी रांगेत बसवता व त्यांचेकडून प्रार्थना वदवून घेतात. प्रार्थनेनंतर त्यांना नाश्ता दिला जातो. व त्यानंतर बालकांना विविध शालेय शिक्षण साधनांच्या मदतीने पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यास प्रोत्साहन देतात. बालकांना वेळेवर आहार व स्वच्छतेच्या सवयी रुजविण्यात अंगणवाडी कार्यकर्ती श्रीम. कल्पना वसंत खोंडे यांचे मोलाचे कार्य आहे. कुपोषित मुलांकडे जास्तीत जास्त लक्षा पुरवतात व गरोदर व स्तनदा माता यांचे आहार व आरोग्याकडे विशेष लक्ष पुरविले जाते. अंगणवाडी केंद्रावर राबविण्यात येणा-या विविध उपक्रमात सहभागी होतात.

What's New